Baby care Kit yojana
बेबी केअर कीट योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीन २६ जानेवारी २०१९ पासून सुरु करण्यात आली आहे.
या योजनेनुसार (yojana) आपल्याला शासकीय रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसूतीवेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला २ हजार रुपये किमतीचे बाळाच्या उपयोगातील “बेबी केअर किट” चा लाभ मिळणार आहे.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व प्रसुत झाल्यानंतर २ महिन्याच्या आत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी बेबी केअर कीट मिळणार आहे.
महाराष्ट्र बेबी केयर किट योजना सामान यादी – (Maharashtra baby care kit list)
- कपडे,
- टॉवेल,
- मच्छरदाणी
- अंगाला लावायला तेल,
- ब्लँकेट,
- प्लास्टिक चटई,
- शाम्पू,
- नेलकटर,
- खेळणी,
- हातमोजे,
- पायमोजे,
- आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड,
- बॉडी वॉश लिक्विड,
- झोपण्याची लहान गादी इ. प्रकारचे साहित्य व हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी लहान बॅग मिळणार आहे.
बेबी केयर किट योजनेचे लाभ (yojana benefits)
— रुग्णालयांमध्ये मुलांना जन्म देण्यास प्रोत्साहन देणे.- शिशु मृत्यु दर (आयएमआर) मध्ये कमी आणणे.- दोन हजार रुपये किंमतीचे बेबी केयर किट प्रदान केले जाईल.
नवजात शिशू व बाळंतीन महिलेची सुरक्षितता.बेबी केयर किट योजनेसाठी नोंदणीकरण प्रक्रिया -राज्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या सर्व मुलांना संबंधित रुग्णालयात बेबी केयर किट मिळेल.
जेथे मुलाचा जन्म होतो त्या आरोग्य केंद्रातच बेबी केअर कीट देण्याची व्यवस्था आहे. याशिवाय आतापर्यंत दुसरी कोणतीही ऑफलाइन किंवा ऑनलाइन नोंदणीकरण पद्धत उपलब्ध नाही.
यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घ्यावी.