airtel jio recharge plan
Airtel आणि Jio चे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान 3 जुलैपासून महाग झाले आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या मोबाईलचे दर 11 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. त्याच वेळी, Vi (Vodafone-Idea) चे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन देखील 4 जुलैपासून महाग होणार आहेत.
याशिवाय जिओने 299 रुपये आणि 399 रुपयांचे पोस्टपेड प्लॅनही महाग केले आहेत. या दोन प्लॅनसाठी वापरकर्त्यांना आता अनुक्रमे ३४९ आणि ४४९ रुपये खर्च करावे लागतील.
349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30GB डेटा आणि 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75GB डेटा दिला जात आहे. तसेच, Jio ने आता मोफत उपलब्ध असलेला अमर्यादित 5G डेटा मर्यादित केला आहे. हा लाभ आता फक्त 2GB किंवा त्याहून अधिक दैनिक डेटाचा प्लॅन घेणाऱ्या युजर्सनाच मिळणार आहे.