या महिलांना मिळणार पिठाची गिरणी योजना साठी १००% अनुदान

Maharashtra free mill yojana

राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती लघुउद्योग सुरु करता यावा या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आलेली एक योजना आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येते त्यामुळे महिलांना स्वतःजवळील रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

योजनेचे लाभार्थी:

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला

योजनेअंतर्गत होणारा फायदा:

Mofat Pith Girni Yojana अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरगुती रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

या योजनेअंतर्गत नवीन पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी राज्य शासनाकडून 100 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

महिलांना घरातच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांना नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी संपेल.राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • कुटुंबाचा उत्पनाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांच्या आत असणे आवश्यक)
  • अनुसूचित जाती/जमाती चा जातीचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील (अर्जदार यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार याचे बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स (यावर अर्जदाराचे नाव,बँकेचे नाव,शाखा,खाते क्रमांक व IFSC कोड नमूद असावा.)
  • व हे बँक खाते सुरु असल्याबाबत मागील तीन महिने खात्यात व्यवहार झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी.)
  • व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना नंबर 8 अ चा घराचा उतारा जोडावा.

विद्युत पुरवठा सोय असलेबाबत एम.एस.ई.बी. च्या नजीकच्या बिलाची झेरॉक्स प्रत.मोबाईल नंबरई-मेल आयडीपासपोर्ट आकाराचे फोटोप्रतिज्ञा पत्र

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल .

अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.

अशा प्रकारे तुमची मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Leave a Comment