LPG Gas Cylinder Price
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. या दरानुसार, आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ३९ रूपयांनी वाढली आहेत.
त्यामुळे देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धक्का बसला असून याचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे.
नवीन दरानुसार, आता १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांनी (gas cylinder) वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १ हजार ६९१ रुपयांना मिळणार आहे.
तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली का?
(१ सप्टेंबर) गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. यामध्ये फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच वाढ झाली आहे. मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
तेल कंपन्यांनी फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच वाढ केली असून घरगुती १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.