लाडक्या बहिणींना लवकरच या तारखेला मिळणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे

ladki bahin yojana installment

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून दोन हफ्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

आता सर्व महिलांना तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा लागली आहे. अशातच आता लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी आली आहे.

कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हफ्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची वाट पाहत आहेत.

आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 15 सप्टेंबर 2024 महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

परंतु, ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीय

काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजते. अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावा आणि डीटीबी एनेबल करावं.

Leave a Comment