ladki bahin yojana complaint number
राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
या योजनेच्या अर्जासाठी जुलै महिन्यापासून सुरुवात झाली. पण रक्षाबंधनाच्या सणामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे हप्ते म्हणजेच एकूण तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसंबंधित प्रक्रिया अजूनही सुरू आहे. परंतु, ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काय करावे? यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
या योजनेंतर्गत खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. यासाठी 181 या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. यासोबतच महिला शक्ती दूत अॅपच्या माध्यमातूनही तक्रारी नोंदवू शकतात.
तसेच ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, अशा तीनही महिन्यांचे पैसे जमा होतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमादरम्यान केली आहे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा फॉर्म भरला आहे. मात्र, पैसे जमा झाले नसल्यास जवळच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे चौकशी करावी.